"डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर ,चिखली" मध्ये प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव समारंभ

Kolhapur news
By -

           



       

             


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

शालेय जीवनापासून विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे या उद्देशाने पंचशील नगर चिखली येथील माजी सैनिक ,वृक्षमित्र, शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व आयु .महादेव  इराप्पा कांबळे यांच्या दातृत्वाने आज शुक्रवार दि. ७ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर, चिखली" मध्ये प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला .


या कार्यक्रमाप्रसंगी आयु.महादेव.इ. कांबळे (माजी सैनिक) ,आयु. अल्लाबक्ष हसन सय्यद सर ( माजी सरपंच ),आयु.अमृता महादेव कांबळे (पोलीस पाटील) ,आयु. गजानन कांबळे, आयु. शितल कांबळे, आयु. लता कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी सरपंच  अल्लाबक्ष सय्यद सर यांनी "विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कठोर परिश्रम व एकाग्रते ने अभ्यास करून यश मिळवावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले".


    आयु.महादेव कांबळे (माजी सैनिक) यांनी "भविष्यकाळात शाळा उज्वल बनवण्यासाठी सर्वतोपरी मदत करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यांमध्ये आपली शाळा गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून आदर्श बनवण्याचा संकल्प केला." 


 या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .तसेच मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक  अण्णा पाटील सर ,मार्गदर्शक शिक्षिका औंधकर मॅडम, आयु. सरिता कांबळे मॅडम, आयु.शितल कांबळे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.



          


                -----------------------------