छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक सरदेसाई वाड्यात उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : 'छावा' प्रदर्शित झाल्यानंतर छ. संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये निर्माण झाली

Kolhapur news
By -

 

          


     मुंबई : छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये निर्माण झाल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा येथे कैद करण्यात आले होते. हा वाडा पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र वाड्याची दुर्दशा पाहून त्यांची निराशा होताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसृष्टी संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.


अमोल मिटकरी यांनी सभागृहात बोलताना संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदेसाई वाड्यात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतिक आहेत. ते धर्मवीर, स्वराज्यारक्षक आहेत. सरदेसाई वाड्यात उचित प्रकारचे स्मारक उभारण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


       --------------------------------------