कोल्हापूर न्यूज नेटवर्क
युनिक बायो फर्टीलायझर्सचे संस्थापक संचालक राम रानगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त १० निराधार मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .
ऊसतोड व वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलासह इतर वंचित घटकातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी काम करणाऱ्या उमेद फाउंडेशन च्या माध्यमातून युनिक बायो फर्टीलायझर्सच्या वतीने राम रानगे यांनी दहा मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे . राम रानगे यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचा उमेद फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये सपत्नीक सत्कार करण्यात आला व संस्थेच्या वतीने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .
राम रानगे यांनी यापूर्वीही गरीब मुलांचे पालकत्व घेऊन ,पूरग्रस्तांना मदत करून, कोरोना कालावधीत गरजूंना भोजनाच्या माध्यमातून मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
---------------------------------------





