कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपुरात दाखल

Kolhapur news
By -

        


      नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा शोध सुरू आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक गुरुवारी नागपुरात पोहोचले. बेलतरोडी येथील त्याच्या घरी जाऊनही तो सापडला नाही.


कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संभाषणाची ध्वनिफीत सावंत यांनी फेसबुकवर शेअर केली होती. फीतमध्ये कोरटकरने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.


या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून तो पोलिसांपासून फरार आहे.


         ------------------------------------