ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटीची खंडणी स्वीकारताना अटक

Kolhapur news
By -

                


सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी करत 1 कोटी स्वीकारत असताना कारवाई करण्यात आली.

         

                हे प्रकरण काय आहे

  

   सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. 2016 मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


त्यानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन १० दिवसांची जेलवारीही झाली होती.


      -----------------------------------------