नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक सुरू झाली आहे. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यामध्ये उपस्थित आहेत. ही CCS ची दुसरी बैठक आहे, पहिली बैठक पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी झाली होती.
CCS बैठकीनंतर लगेचच संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट कमिटीची बैठक होईल. या समितीला सुपर कॅबिनेट असेही म्हणतात. त्यानंतर आर्थिक व्यवहार समिती आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल.
तत्पूर्वी, मंगळवारी पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्करप्रमुख, एनएसए अजित डोभाल, सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत दीड तास उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि दहशतवादाविरुद्ध कारवाईची पद्धत, लक्ष्य आणि वेळ लष्कराने ठरवावी असे सांगितले.
-------------------------