बिहार : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ जणांनी प्राण गमावले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आक्रमक झाले असून पाकिस्तानविरोधात शड्डू ठोकला आहे. पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावलं उचलली जात असतानाच त्यांनी दहशतवाद्यांनाही थेट इशारा दिला आहे. आता कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार, दहशतवाद्यांचे कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी हा हल्ला केलाय त्यांना कठोर शासन देणार. उरले सुरले दहशतवादी जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दोषीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांला शोधून काढून शिक्षा दिली जाईल.' तसेच 'हा हल्ला फक्त पर्यटकांवर नाही तर देशाच्या आत्म्म्यावर करण्यात आला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत म्हटलंय. ते बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने बोलत होते.