पहेलगाम हल्ल्याचा मुंबई हायकोर्टाकडून निषेध

Kolhapur news
By -

            

        


मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याबाबत सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाकडूनही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.


न्यायालयातील कामकाज सुरू करण्यापूर्वी 2 मिनिटे मौन बाळगून मृतांना आदरांजली वाहण्यात आली. दुसरीकडे या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून मुंबईतील शिवसेना भवनसमोर आंदोलन करण्यात आले.


आज मुंबई उच्च न्यायालयातील कोर्ट रूम क्रमांक 46 मध्ये सकाळी 10:30 वाजता मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर उपस्थित सर्वांनी उभे राहत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. 


     -------------------------------------