कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
यमगे गावच्या मेंढपाळाच्या मुलांने मिळविलेल्या अलौकिक यशाचा आनंद फक्त गावालाच काय पण सगळ्या तालुक्याला झाला. वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांचे सह अनेक राजकीय पुढाऱ्यांनी पण बिरुचे कौतुक केले.गावात त्याच्या भव्य मिरवणुकीची तयारीही सुरू आहे.चित्तरकथा , मुलाखती, हारतुरे यांचा ओघ आहेच.
त्यातच काश्मीर मधील पहेलगाव येथे सव्वीस निरपराध ,निष्पाप पर्यटकांना विकृत मनोवृत्तीच्या अतिरेक्यांनी निष्ठुरपणे गोळ्या घालून ठार केल्याचे वृत्त आले.देशभर संतापाची लाट पसरली.दुःखाश्रुंचा पूर वाहू लागला.तो यमगे गावात सुद्धा पोचला.
बिरुची निवड भारतीय पोलिस सेवेत झालीआहे.गुन्हेगारी,गुंडगिरी,दहशतवाद,खंडणी,खून, मारामाऱ्या यांच्याशी पोलिस खात्याचा नित्य नियमांने संबंध येतोच.कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) यांचे पोलिसांशी दृढ नाते असते.
आय पी एस बिरदेव साहेबांची भव्य मिरवणूक मुरगूड मधील शिवतीर्थावरून काढण्याचे शिवभक्त व यशवंत सेनेने ठरवले आहे .तरीही अतिरेकी हल्ल्यात प्राण गमावलेल्या आपल्या देशबांधवांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या साठीही दु:खाश्रूंना वाट करून द्यावी लागणार आहे.
या अतिरेकी हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.काश्मीरमधील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी विशाल केंडल मार्च काढून दाखवून दिले की दहशदवादाला कोणताही धर्म नसतो.
"आम्ही प्रथम हिंदुस्थानी आहोत मग काश्मिरी आहोत"
असे त्यांनी म्हंटले आहे.
आम्हां गावाकडच्या नागरिकांसाठी बिरदेव साहेब म्हणजे आमचा लाडका, निरागस हसऱ्या चेहऱ्याचा बिरू आहे.
तरीही त्याच्या उत्तुंग यशाला एक सलाम आणि भावी कामगिरीला मनःपूर्वक शुभेच्छा.
-----------------------------------