बेळगाव : आयपीएस बिरदेव डाेणे यांचा बेळगाव येथे बकरी तळावर नातेवाईकांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
कागल तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा मान मिळालेला बिरदेव हा मेंढपाळ कुटुंबियातील आहे. वडील मेंढपाळ, घरची परिस्थिती बेताची, अशा प्रतिकूल परिस्थितीत यमगेतील बिरदेव सिद्धाप्पा डाेणे यांनी अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षी सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले आहे. बिरदेव यांचा मेंढपाळ ते आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत प्रवास थक्क करणारा असून भारतीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मुलांच्यासाठी व त्यांच्या पालकांना प्रेरणादायी असाच आहे. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
--------------------------------