अमेरिका उपराष्ट्रपतींनी मुलगीला कडेवर घेऊन ताजमहाल पाहिला

Kolhapur news
By -

 

         


      नवी दिल्ली : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेम्स डेव्हिड वेन्स यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. पत्नी उषा, मुले विवेक, इवान आणि मुलगी मिराबेल यांच्यासोबत एका डायमा बेंचवर बसून फोटो काढला. वेन्स आपल्या मुलीला कडेवर घेऊन ताजमहाल संकुलात फिरले. वेन्स यांची तिन्ही मुले भारतीय रंगात दिसली. दोन्ही मुलांनी सारखाच पारंपरिक कुर्ता-पायजमा घातला होता.


ताजमहालच्या अभ्यागत पुस्तकात वेन्स यांनी लिहिले - ताजमहाल अद्भुत आहे! खऱ्या प्रेमाची, मानवी साधेपणाची आणि भारताच्या महान संस्कृतीला आदरांजलीची साक्ष... धन्यवाद. असे सांगितले जात आहे की, वेन्स यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभ्यागत पुस्तकात लिहिलेले पत्र देखील वाचले.


            -------------------------