विद्यार्थ्यांनी एकदातरी रायगडावर यावे, अशी व्यवस्था करणार- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Kolhapur news
By -

 

           





    रायगड : ७ वी ते १२ वी मधील विद्यार्थी एकदा तरी रायगडवर आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य कसे असावे यांचा एक उदाहरण दिले आहे. शिवराय म्हणाले होते की , स्वराज्याची लढाई कधी थांबता कामा नये, भारताला जगात चांगले स्थान निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू आहे. शिवरायांनी जे-जे सांगितले ती कामे करण्यासाठी आमचे  सरकार काम करणार आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  दाेन दिवसीय  महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.  त्यानंतर ते बोलत होते. 


'स्वराजाची संकल्पना ही शिवाजी महाराजांची होती. त्यांनी 200 वर्षांची मुघलांची गुलामगिरी संपवली. स्वातंत्र्यासाठी त्यांचीच प्रेरणा होती. आपल्याला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे. जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा भारत जगात एक नंबरवर असले', असा संकल्प अमित शाह यांनी केला.


    महाराष्ट्रातील जनतेला विनंती... 


मी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो की शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेऊ नका. देश, जग त्यांच्यापासून प्रेरणा घेते. आपल्या स्वातंत्र्याची पहिली लढाई त्यांनी लढली. रायगडापासून प्रेरणा घेऊ नये म्हणून इंग्रजांनी रायगड उद्धवस्थ करण्याचा प्रयत्न केला.', असे देखील अमित शाह म्हणाले.

 

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम गेल्या काही दिवसापासून रखडलेले आहे. हे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात लवकरच स्मारक कोणत्याही परिस्थितीत झाले पाहिजे यासाठी राज्य सरकार  प्रयत्नशील आहे. 


          ------------