कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा जनसेवेचा जाज्वल्य वारसा त्यांचे चिरंजीव माजी खासदार संजय मंडलिक यांनी तितक्याच तडफेने चालविला आहे. विजय आणि पराजय यांचा हिशोब पामरांनीच मांडावा. सच्चा लोकसेवकाला त्याची कधीच पर्वा नसते.असे उद्गार मुरगुडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी काढले.ते पुढे म्हणाले की त्यांच्यासारखे दृढ निश्चयी,साहसी नेतृत्व जिल्ह्याला लाभले याचा आम्हाला अभिमान वाटतो.पराभवाने खचून जाणारे ते नेते नाहीत.जन जनसेवेसाठी सत्तेची खुर्चीच पाहिजे ही समजूत चुकीची असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
माजी खासदार संजय मंडलिक यांच्या एकसष्टी सोहळ्यात त्यांचा गौरव करताना ते बोलत होते.
हा एकसष्टी सोहळा मुरगूडमध्ये विविध उपक्रमांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. प्रथम मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्या उपस्थितीत फळे वाटण्यात आली.
चिमगाव येथील भावेश्वरी माध्यमिक आश्रम शाळेतील अनाथ मुलांनाही माजी नगरसेवक मारुती कांबळे,विक्रम गोधडे, राजू भाट, विनायक मुसळे, सचीन भारमल, राजु कांबळे, सूरज सुतार, शुभम भोसले ,अक्षय शिंदे यांच्या हस्ते फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले,माजी नगरसेवक एस. व्हि. चौगुले,किरण गवाणकर,सुहास खराडे,दत्तात्रय मंडलिक,दीपक शिंदे,दिलीप कांबळे,संभाजी आंगज,दिगंबर परीट,सर्जेराव पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
स्वागत के.एम.लोकरे यांनी तर प्रास्ताविक नेताजी आंगज यांनी केले .आभार मांगले सर यांनी मानले.
----------------------------------