नानीबाई चिखलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवास सुरुवात

Kolhapur news
By -

 

           


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सव नानीबाई चिखली दि.11 एप्रिल 2025 पासून सुरू झाला आहे या जयंती महोत्सवात "महात्मा बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज ,छ.शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक जागरा बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पंचशील तरुण मंडळ व समाज बांधवांच्याकडून करण्यात आलेले आहे. 


दिनांक 10 एप्रिल पासून पंचशील नगर, अण्णाभाऊ साठे नगर, बौद्ध नगर अशी नगरे विद्युत रोषणाईने उजळून निघालेली आहेत. घरोघरी पंचशील ध्वज , निळे ध्वज उभारून जयंती सोहळ्यामध्ये आनंददायी वातावरण तयार करण्यात आलेलं आहे. शुक्रवार दिनांक  11 एप्रिल 2025 रोजी महात्मा फुले यांच्या जयंती दिवशी प्रतिमापूजन करून जयंती सोहळ्याला सुरुवात झाली या दिवशी रात्री 9.00 वा."सत्यशोधक" चित्रपट दाखवण्यात आला. शनिवार दिनांक 12/0 4 /2025 रोजी रात्री 9.00 वा.आयु.बाबाजी पवार यांचा "हिप्नॉटिझम" कार्यक्रम घेण्यात आला. रविवार दिनांक 13/04/ 2025 रोजी "भीमनाद" प्रस्तुत "नवमहाराष्ट्र शाहिरी जलसा" हा  महात्मा बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा महापुरुषांचा वैचारिक वारसा सांगणारा शाहिरी गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे . 


सोमवार दि.14 /04 /2025 रोजी सकाळी 9.00 वा. माणगाव येथून "भीम जयंतीचे" आगमन या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व समाजातील "समाजरत्न गुणवंत विद्यार्थी व मान्यवर" यांचा सत्कार समारंभ आयु. शिवाजी करै (सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरगुड) आयु.प्रशांत गोजारे (सहाय्यक फौजदार मुरगुड), आयु. जगदीश कांबळे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोल्हापूर )गावचे सरपंच ,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील व समाजातील प्रमुख मान्यवर मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.


 मंगळवार दि. 15/0 4/ 2025 रोजी सकाळी 9.0 ते दु. 2.00 या सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली यांचेमार्फत आरोग्य शिबिर व जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच दिवशी सायंकाळी 5.00 वा. शालेय विद्यार्थ्यांसाठी "डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती परीक्षेचे "आयोजन करण्यात आलेले आहे .तसेच रात्री 9.00 वा. शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचा "विविध कला गुणदर्शन- सांस्कृतिक कार्यक्रम" आयोजित करण्यात आलेला आहे. बुधवार दिनांक 16/0 4/ 2025 रोजी दु. 3.00 वा. "भव्य मिरवणूक व अतिषबाजी" आयोजित करण्यात येईल. दि. 17/ 4 /2025 रोजी "शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली"या ठिकाणी होईल. जयंती सोहळ्याच्या कालावधीत सर्व समाज बांधवांच्या घरी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.


          --------------------------------