कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथे राम जन्मोत्सव अत्यंत जल्लोषात पार पडला. मुरगूड चे पहिले नगराध्यक्ष स्व .विठ्ठलराव पाटील यांच्या घरी त्यांचे चिरंजीव अविनाश पाटील व इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव झाला.कीर्तनकार नारायण एकल ,जोगेवाडी यांचे सुश्राव्य कीर्तन व वारकरी समुदायाचे भजन संपन्न झाले. बारा वाजून पाच मिनिटांनी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली . महिला भगिनींनी रामाचा पाळणा म्हटला. वारकऱ्यांना उपवसाचे प्रसाद वाटप करण्यात आले.उद्या महाप्रसाद आहे.
गावात राममंदिरात सुद्धा रामभक्तांनी अत्यंत उत्साहात श्रीरामाच्या जयजयकारात राम जन्मोत्सव साजरा केला. दोन्ही कडे अनेक रामभक्त उपस्थित होते.अविनाश पाटील यांच्या कडील उत्सवात गजानन मोहिते सदाशिव यादव दयानंद बीएस खामकर पांडुरंग सारंग इंजिनियर दरेकर प्रकाश वाडकर पांडुरंग दरेकर इत्यादी उपस्थित होते राम मंदिरात तानाजी भराडे, सर्जेराव भाट ,प्रकाश परिषवाड, जगदीश गुरव, धनंजय सूर्यवंशी, पप्पू कांबळे ,अमोल मेटकर महेश कुलकर्णी, आनंदा रामाने, ओंकार पोतदार व मंदिराचे पुजारी अनुबोध गाडगीळ उपस्थित होते.
यावेळी नवीन भव्य मंदिराचा संकल्प सोडण्यात आला असून त्यात मोठा मंडप असेल.रामभक्तांसाठी मंदिरात सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात .राम म्हणजे भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे ,सद्विचार,आणि सद्वर्तन यांची प्रेरणा आहे.पराक्रमाची व दुष्टांच्या निर्दालनाची शक्ती आहे.असे प्रतिपादन कीर्तनकारानी केले.
----------------------------------------------