कोल्हापूरकरांना १०० टक्के मार्क मिळाले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Kolhapur news
By -

 

               


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

 कोल्हापुरात महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून आल्या. कोल्हापूरकरांना १०० टक्के मार्क मिळाले. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. इथला कोणी नाद करायचा नाय आणि त्यांनी निवडणुकीत दाखवून दिले. पहिल्यांदाच राधानगरी भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खाते सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे मागून घेतल्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी सांगितले


विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या भरभरून आशिर्वादाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचे आभार मानन्यासाठी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नाम.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सरवडे, ता.राधानगरी येथे आभार यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्या आभार यात्रेमध्ये ते बोलत होते. 


 ते पुढे म्हणाले ,मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५० कोटींची गरजू रुग्णांना मदत केली तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्याने अडीच वर्षात केवळ अडीच कोटी दिले होते. शासन आपल्या दारी उपक्रमातून पाच कोटी लोकांना लाभ मिळाला. मागील अडीच वर्ष केलेल्या अमर्याद कामाने जनतेने भरभरुन आशीर्वाद दिला. महाराष्ट्र नंबर एकवर नेऊन ठेवला आहे. या राज्यात विकासाच्या प्रचंड संधी आहेत, असे ते म्हणाले. अडीच वर्षात सरकारने शेतकऱ्यांना ४५००० कोटींची मदत केली. १५० सिंचन योजनांना मंजुरी दिली.   


सदगुरु संत बाळुमामा यांच्या तीर्थ क्षेत्रासाठी ६५० कोटींचा विकास आराखडा तयार होत आहे. कोल्हापूर संतांची, वारकऱ्यांची, धारकऱ्यांची भूमी आहे. इथल्या तीर्थक्षेत्रांचा, मंदिरांचा, गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. 


देशातील सर्वाधिक पायाभूत सेवा प्रकल्प आकारास येत आहेत. महायुतीचा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त होता की विरोधी पक्षांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. हा महाराष्ट्रातील जनतेने इतिहास घडवला आहे.


यावेळी खासदार धैर्यशीलदादा माने, माजी खासदार संजयदादा मंडलिक, आमदार राजेशजी क्षीरसागर, आमदार चंद्रदीपजी नरके, आमदार राजेंद्रजी पाटील-यड्रावकर, आमदार दिलीपराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजश्रीताई जाधव, जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, शिवसेना उद्योग आघाडीचे उदय सावंत यांच्यासह प्रमुख मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कोल्हापूरकर मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


   --------------------------------------