कोल्हापूर : दैनिक पुढारीचे संस्थापक संपादक कै. श्री. ग. गो. जाधव यांचा स्मृतिदिन. या औचित्याने महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील पुढारीच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
ग. गो. जाधव हे एक विचारवंत पत्रकार, प्रभावशाली संपादक आणि समाजप्रबोधनासाठी झटणारे कणखर नेतृत्व होते. ‘पुढारी’ या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत निर्भीड पत्रकारिता पोहचवली आणि समाजाला दिशा देणारे विचार रुजवले.
मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केलेले हे अभिवादन म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राच्या सामाजिक व पत्रकारितेच्या इतिहासाला सलामच आहे. "पुढारीकार" या नावाने ओळखले जाणारे ग. गो. जाधव यांचे विचार आणि कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी संवाद साधला.
यावेळी बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील व पुढारी समूहाचे सर्व मान्यवर उपस्थित होते.
--------------------------