कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी मंगळवारी नानीबाई चिखलीत 'तिरंगा पदयात्रा' चे आयोजन करण्यात आले होते . हातात तिरंगा घेऊन, 'वंदे मातरम्', 'भारत माता की जय', 'दहशतवाद मुर्दाबाद' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.ही पदयात्रा हुतात्मा हरीबा बेनाडे गल्ली मधून सुरुवात झाली व मेन रोड देवर्षी कॉर्नर, मेन रोड,शुक्रवार पेठ मेन रोडवरून परत येत सोमवार पेठ येथे समारोप झाला.
समारोप प्रसंगी बोलताना बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले म्हणाले , ही पदयात्रा आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली देण्याची सामूहिक भावना आहे. समाज म्हणून एकत्र येऊन आपले कर्तव्य बजावण्याचा हा प्रयत्न असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या तिरंगा पदयात्रेमध्ये समस्त चिखलीकरांनी सहभाग घेतला.
-------------------------------