कोल्हापूर न्यूज नेटवर्क
1 नोव्हे 2005 पूर्वीच्या शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबतचे प्रस्ताव मुख्याध्यापकांचे पडताळणीसह कडून मागवून घेणे बाबत शिक्षणाधिकारी यांना कळवावे .अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्व खालील शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांचेकडे केली .
या निवेदनामध्ये म्हटले आहे की ,मुंबई हायकोर्टामध्ये पेटिशन क्रमांक 1234 / 2014 मधील निकाल दि .27 फेब्रुवारी 2025 अन्वये मा .हायकोर्टाने राज्यातील खाजगी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जुन्या पेन्शनबाबतचे प्रस्ताव 45 दिवसाच्या आत पडताळणी करून करून घेणे बाबतचा निर्णय दिलेला आहे .राज्यातील अन्य विभागातील उपसंचालक यांनी असे प्रस्ताव पाठवणे बाबत आपापल्या विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना कळवलेले आहे . पण कोल्हापूर विभागातून अशा प्रकारची कार्यवाही केलेली नाही .त्यामुळे कोल्हापूर विभागातील सांगली ,सातारा कोल्हापूर 'सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील 1नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रस्तावाची मागणी करणे प्रलंबित राहिलेली आहे .त्यामुळे अन्य विभागाप्रमाणे आपले कोल्हापूर विभागाकडूनही असे प्रस्ताव मागून घेणेबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात यावे "अशी मागणी या निवेदनात केली आहे . मा .शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी शासनस्तरावर चर्चा करून असे प्रस्ताव मागवून घेण्यांत येतील व हा प्रश्न मार्गी लावला जाईल . असे आश्वासन दिले .
शिक्षण उपसंचालक यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे ,राज्य सचिव शिवाजी भोसले ' जिल्हाध्यक्ष कुमार पाटील ,पतसंस्थेचे चेअरमन । मच्छिंद्र नाळे व जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे सदस्य सुदेश जाधव हे उपस्थित होते
---------------

