कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पूल व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांचे कडे केली आहे.येथील विश्वनाथराव पाटील बँकेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते.
तलाव पूर्ण भरला की पाणी सांडव्यावरून रस्त्यावर येते.या पाण्यातूनच नागरी वाहतूक सुरू असते .बरेच दिवस हे पाणी रस्त्यावर साठून राहिल्याने शेवाळ तयार होते.त्यावर मोटासायकल्स घसरून अनेक अपघात झाले आहेत.नवख्या स्वारांना तर गंभीर दुखापती झाल्या आहेत. हा रस्ता कापशी,गडहिंग्लज व बेनिक्रे मार्गे निपाणी या गावांना मुरगूडशी जोडतो.अवजड वाहनांची पण मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.
तलाव कागलकर सरकार यांच्या खाजगी मालकीचा असल्याने यापूर्वी केलेली पुलाची मागणी पूर्णत्वास गेली नाही.त्यामुळे सरळ शासनाकडेच मागणी करण्याचे ठरवून येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा यांचेकडे केली आहे.
सर्जेराव भाट ,तानाजी भराडे ,जगदीश गुरव इत्यादी कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेतला.
--------------------------

