कोल्हापूर न्यूज / वि. रा .भोसले
भारतीय जवान आपल्या प्राणांची बाजी लावून सीमेवर शत्रूला सामोरे जात आहेत. राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राण्यांची आहुतीही दिली आहे. सोफिया कुरेशी सारख्या विरांगणांनी आपल्या देशाच्या रक्षणात कोणती ही कसर ठेवलेली नाही.आपल्या देशाचे दुर्दैव असे की, ज्योती मल्होत्रा सारख्या देशद्रोही महिला पाकिस्तानसाठी एजंट म्हणून काम करतात. अशा एजंटाना खरं तर देहांत शासन मिळायलाच हवे.ज्योती बरोबर आणखी कांहीं लोक आहेत ,हे सगळे आपले अंतर्गत शत्रू आहेत.
समाज व्यवस्था काळवंडून टाकणाऱ्या असल्या ज्योतींचे मशालीत रूपांतर होऊ देता कामा नये.त्यापूर्वीच त्यांचा चोख बंदोबस्त झाला पाहिजे. पाकिस्तानवर कदापीही विश्वास ठेवू नये.दहशतवाद पोसणारे ते जगातील एकमेव राष्ट्र आहे.विशेष म्हणजे भ्याड व विकृत आहे. भारताविषयीच्या अत्यंतिक द्वेषाने ते पोखरले आहे.चार वेळा युद्धात मार खाल्लेले राष्ट्र अजूनही मुजोरी करते ते या भारत द्वेषामुळेच.
सातशे वर्षे भारतावर आम्हीं राज्य केले अशी वल्गना पाकिस्तानी आजही करत आहेत.ते चुकीचं नाही.आपल्याच लोकांच्या फितुरी मुळे आपण सातशे वर्षे गुलामीत काढली .
शिवछत्रपतींना देखील आधी आपल्या लोकांचा बंदोबस्त करावा लागला होता. त्यात त्यांचे कांहीं भाऊबंद देखील होते.भारत सरकारने तोच आदर्श गिरवला पाहिजे.जगातील इतर राष्ट्रे जर आपल्या छत्रपतींचा आदर्श घेत असतील तर आपण का नये.फितुरी संपवलीच पाहिजे.पाकिस्तान अत्यंत विश्र्वासघातकी आहे.आपले २६ निरपराध पर्यटक गेले ते या अती विश्वासामुळेच.एवढे भयानक प्रकार होऊनही आपले साहसी पर्यटक थांबलेले नाहीत.केदारनाथ,काश्मीर ,येथे ते अजूनही गर्दी करत आहेत.त्यांचे रक्षण झाले पाहिजे.
महाराष्ट्रातील कांहीं पर्यटकांनी तर म्हंटले आहे की आता आम्हाला प्राणांची भीती वाटत नाही.आपल्या जवानांच्यावर त्यांचा विश्वास वाढला आहे.भारतीय सेनेची ताकद जगाला कळली आहे.
पाश्चिमात्य देशांनी तोंडात बोटे घातली आहेत.चीनने डोळे विस्फारले आहेत.आता बाहेरचा धोका नाही.धोका आहे तो देशातल्या असल्या एजंटांचा.
देश बांधवांनो आपण जगात पाहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पोचू असा अंदाज परदेशी पंडितांनी केला आहे.याचा अभिमान ठेवूया आणि देशाचे तेज काळवंडून टाकणाऱ्या मिणमिणत्या ज्योती आधी विझवून टाकूया.
---------------------