कोल्हापूर न्यूज नेटवर्क
टिटवे ता.राधानगरी येथे आज पहाटे घडलेली ही घटना आहे. गाईंची अनेक वासरे तेथे डांबून ठेवण्यात आली होती.ही वासरे कत्तलीसाठी कत्तलखान्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प.पू प्राणलिंग स्वामीजी वीरूपाक्ष लिंग यांना मिळाली. त्यांनी लगेच गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना वासरांची कत्तल थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत व तसे पोलीस स्टेशनला कळवावे असे सांगितले.
श्रीखंडे यांनी लगेच सरवडे व मुरगुड येथील सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांना ही माहिती दिली.
कार्यकर्ते लगेच सावध झाले व त्यांनी MH 11 DD 1643 या टेम्पोचा पाठलाग केला . मुदाळ तिट्टा येथे गोरक्षकांनी ही गाडी शिताफिने पकडली . पोलिसांनी सुद्धा गोरक्षकाना सहकार्य केले व ताब्यात घेतलेल्या वासरांची रवानगी जिजाऊ गोशाळा सावर्डे येथे करण्यात आली.
मुरगुड येथील गोरक्षक हिंदू बांधवांची नावे याप्रमाणे...
सर्जेराव भाट , प्रकाश पा रिश्वाड ,तानाजी भराडे, संकेत शहा सागर भाट जगदीश गुरव. या युवकांना सरवडे येथील बजरंग दलाचे सुद्धा सहकार्य मिळाले.
धाडसी कार्यवाही बद्दल सकल हिंदू समाज तथा हिंदुत्ववादी संघटनांनी या सर्वांचे तसेच पोलिसांचे आभार मानले. राम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवकांनी केलेल्या या संवेदनशील कृतीचे रामभक्तांनी मोठे स्वागत केले आहे .
-------------------------------------------

