चेन्नई : सुपर किंग्जला पाच वेळा जेतेपद मिळवून देणारा कर्णधार एमएस धोनी आज आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.
खरंतर, आज माहीचे पालक दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला जाणारा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. माहीची पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे चर्चाना बळ मिळाले आहे.
सहसा फक्त साक्षी आणि जीवा स्टेडियममध्ये दिसतात, माहीचे पालक स्टेडियममध्ये दिसत नाहीत.
२० वर्षात कधीही सामना पाहिला नाही.
धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००७ मध्ये कर्णधार म्हणून त्याने भारताला टी २० विश्वचषक जिंकून दिला. २०११ मध्ये त्याने भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यास मदत केली. पण या काळातही, त्याचे वडील पान सिंग आणि आई देवकी देवी त्याला पाहण्यासाठी कधीही जगातील कोणत्याही स्टेडियममध्ये गेले नाहीत. धोनीच्या पालकांचे अचानक आगमन हे धोनीचा शेवटचा सामना असू शकतो, अशी अटकळ बांधण्यास पुरेसे आहे.
--------------------------------


