आयपीएस बिरदेव डाेणे़ यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाने पाठवली १००० पुस्तके

Kolhapur news
By -

                    

                     
                          
         

 
   मुंबई : अलीकडेच UPSC निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक तरुण विशेष चर्चेत आला तो म्हणजे बिरदेव डाेणे. ' बुके नको, बुक द्या ! ' या अनोख्या आवाहनामुळे तो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. बिरदेवने म्हटलं की, "माझा सत्कार करताना फुलांचे बुके न आणता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आणा". बिरदेवचे हे विचार आणि त्याच्या आवाहनाचं सर्वत्र कौतुक होत असताना प्रसिद्ध  पोलो खेळाडूने त्याला १००० हजार पुस्तकं पाठवली आहेत.शिखर हा एक प्रोफेशनल पोलो खेळाडू असून माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे . 


बिरदेवच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बिरदेवला पुस्तकं पाठवणारा हा  पोलो खेळाडू म्हणजेच शिखर पहारिया  ज्याचं नाव बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरशी जोडण्यात आलं आहे. शिखर हा अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड म्हणूनही चर्चेत असतो. 

        -------------------------------