शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक सापडले अँटिकरप्शन च्या जाळ्यात : शाळेतच केली कारवाई

Kolhapur news
By -

 

       




  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत  प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहाथ पकडले. महापालिकेच्या शेलाजी वनाजी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संजय जयसिंग नार्वेकर (वय ५२ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी शाळेतच ही कारवाई झाली. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


 

यातील तक्रारदारांना जातीचा दाखला काढावयाचा होता. यासाठी वडील व पाच चुलते अशा सहा जणांचा शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापक नार्वेकर यांनी तीन हजार रुपयांचे लाच मागितली. शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे झाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि तीन हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले.


  -------------------------------------------