मुलीच्या आयएएस होण्याचा आनंद साजरा करत असताना वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू

Kolhapur news
By -

         


   यवतमाळ:जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आणि यातच त्यांचे निधन झाले. प्रल्हाद खंदारे असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. पुसद पंचायत समितीचे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.


प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आयएएस अधिकारी पदावर निवड झाली. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमातच प्रल्हाद खंदारे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने महागाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. खंदारे कुटुंबावर यामुळे शोककळा पसरली आहे. आनंदाचा क्षण क्षणात दुःखात बदलून गेला.


      --------------------------------