एक लाख शाळांमध्ये ५ लाख शिक्षकांच्या माध्यमातून १ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यशिक्षणाचा हाेणार प्रसार : देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद होणार

Kolhapur news
By -

          


मुंबई : महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात २८ एप्रिल २०२५, सोमवार या दिवशी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात, शालेय शिक्षण विभाग व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यात 'मूल्यवर्धन' उपक्रमाच्या राज्यभर प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. 


 सुमारे १ लाख शाळांमध्ये अंमलबजावणी होणार. ५ लाख शिक्षकांच्या माध्यमातून १ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत मूल्यशिक्षणाचा प्रसार होणार.महाराष्ट्र शासनाचा हा संकल्प स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात व्यापक आणि प्रभावी मूल्यशिक्षण उपक्रम ठरणार असून, संपूर्ण देशासाठी एक दिशादर्शक म्हणून ओळखला जाईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य मूल्याधारित शिक्षण सर्वाधिक व्यापक प्रमाणावर राबवणारे भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून नोंदवले जाणार आहे.


या ऐतिहासिक सामंजस्य कराराच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रंजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राहुल रेखावर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व सचिव श्रीकर परदेशी हे मान्यवर उपस्थित होते.


शांतिलाल मुथ्था फाउंडेशनकडून संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, ट्रस्टी वल्लभ भंसाली व अतुल चोरडिया, मैनेजिंग डायरेक्टर कोमल जैन, एक्सिक्यूटिव डायरेक्टर व्ही. वेंकटरामण, आणि डायरेक्टर जयराजन तिरुमिट्टाकोडे यांचीही उपस्थिती होती. "मूल्यवर्धन" उपक्रम ज्ञानरचनावादावर आधारित व विद्यार्थी-केंद्रित असून, विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, नैतिकता आणि जबाबदार नागरिकत्व घडवण्यासाठी निर्णायक भूमिका बजावणार आहे. महाराष्ट्र शासनाने आज शिक्षणाच्या क्षेत्रात मूल्याधारित क्रांतीचा प्रारंभ केला आहे, जो संपूर्ण भारतासाठी मार्गदर्शक ठरेल.


      ----------------------------------