युपीएससी मध्ये यश प्राप्त केलेल्या हेमराज पनोरेकरने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले- व्ही.बी.पाटील

Kolhapur news
By -

    


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क

         


 यूपीएससी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोल्हापूरच्या सहा विद्यार्थ्यांनी यशाचा झेंडा फडकावला. यामध्ये सध्या फुलेवाडी येथे राहणारा मूळचा पन्हाळा तालुक्यातील पनोरे या दुर्गम गावातील हेमराज हिंदुराव पनोरेकर हा यशस्वी झाला आहे. आज कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी, कोणताही क्लास न लावता मी घरात अभ्यास करून हे  यश मिळवले असल्याचे हेमराजने सांगितले. 


दरम्यान, तुझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. वडील शाहू हायस्कूल मध्ये सीनियर क्लार्क म्हणून सेवा बजावत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुला त्यांनी दिलेली साथ फार महत्त्वाची आहे. तुझ्या यशामध्ये आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असल्याचे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. 


यावेळी आर. के. पोवार यांनी, आमच्या कोल्हापूरचे नाव तुम्ही मोठे केले. त्याबद्दल आम्हा शहरवासीयांना अभिमान असल्याबाबतचे सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी सर्वांचे आभार मानले. 


यावेळी महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, सेक्रेटरी सुनील देसाई, उपाध्यक्ष दिनकर कांबळे व हेमराजचे आई वडील उपस्थित होते.


   ---------------------------------