बाबासाहेबांच्या 'जनता' चे ३ खंड प्रकाशित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन, इंग्रजी खंड दोनची नवी आवृत्तीही प्रकाशित

Kolhapur news
By -

 

         



       मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 व 9 या 3 खंडांसह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर व इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8 व 9 ची निर्मिती करण्यात आली आहे.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'जनता' हे वृत्तपत्र 1930 ते 1956 दरम्यान प्रकाशित झाले होते. हे वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीचा एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित व प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून ते सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपरोक्त खंडांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.


        -------------------------------