नानीबाई चिखलीतील करीम जमादार व ऋतूराज शिरगुप्पे यांची मुबंई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर निवड

Kolhapur news
By -

 

         


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  कागल तालुक्यातील नानीबाई चिखलीतील करीम इम्तियाज जमादार व  ऋतूराज अनिल शिरगुप्पे या दोघांची मुबंई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे.  गेल्या तीन वर्षापासून दोघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते . सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या या दोघांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. 


       सद्यस्थितीत आमची मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदावर जरी निवड झाली असली तरी भविष्यात आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  परीक्षा देणार आहोत असा मनोदय करीम आणि ऋतुराज यांनी या निवडीनंतर बोलताना व्यक्त केला. 

     


        


            -----------------------------