26 / 11 चा मास्टर माईंड तहबूर राणाला फाशी होईल का ?

Kolhapur news
By -

 

             



       कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले


26 /11 चा तो दिवस आठवला की अंगावर शहारे येतात.

  ज्यांना लढायची हिम्मत नसते ते असे भ्याड हल्ले करत असतात. काश्मीर मिळत नाही,पूर्व पाकिस्तान हातातून गेले.भारतासमोर मैदानात उतरले तर उरलेली अब्रु सुध्दा जाणार म्हणून पाकिस्तान अशा अतिरेकी हल्ल्यांना प्रोत्साहन देत असते.

   तसे नसते तर 26/11 चे अतिरेकी पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरत राहिले नसते.

    त्यातलाच एक तहुर राणा अमेरिकेत होता.त्यामुळे इतके दिवस तो सापडत नव्हता.मोदी सरकारची मुत्सद्देगिरी कामी आली आणि राणा सापडला.खास विमानाने त्याला दिल्लीत आणले .एन आय ए च्या कोठडीत चोख बंदोबस्तात तो आहे.

    26/11 च्या अतिरकी हल्ल्यातील कसाब सोडून सर्व मारले गेले. कसाब जिवंत सापडला .

कित्येक महिन्यांनी तो फासावर गेला.

    असे किती दिवस चालायचे .राणा सापडला. त्याचा दावा चालणार .दोषी आढळला तर त्याला फाशीच व्हायला पाहिजे.जे निष्पाप नागरिक मारले गेले त्यांचा गुन्हा काय होता.

  त्यात कांहीं विदेशी नागरिक व मुस्लिम परिचारिका देखील होत्या.

    एके 47 सारख्या शस्त्रातून सुटणाऱ्या गोळीला समोरच्या व्यक्तीचे वय ,जात किंवा धर्म माहित नसतो.प्राण घेणे एवढेच माहित असते.

  का बरे त्यांनी आपले प्राण गमवावेत.?

    विकृत मनाच्या निष्ठुर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला .का तर त्यांच्या पाकिस्तानी आकांनी त्यांना तसे बजावले होते.

त्यामुळे काय साध्य होणार होते ?

     भारत देशात दहशत निर्माण करणे हेच उद्दिष्ट.

  याच दहशतीच्या जोरावर आक्रमकांनी आपल्या देशातील निष्पाप गोर गरीब लोकांवर हजार वर्षे राज्य केले.त्यांचा अमानुष छळ केला .

  याच दहशतीच्या जोरावर त्यांनी गरीब लोकांचे धर्मांतर केले.

    विजय नगर सारखी साम्राज्ये लयाला गेली.राणा प्रताप सारखे कांहीं राजपूत योद्धे शेवटच्या श्वासापर्यंत लढले.मानसिंग सारख्या फितूर लोकांमुळे आपले शूर सैनिक सुद्धा युद्धे हारत गेले.

     छत्रपती शिवाजी महाराज नसते तर देशाची काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करवत नाही.

  त्यांनाही फितुरीने हैराण केले होते.छत्रपतींनी त्यातूनही नवे राष्ट्र उभे केले.

    राणा ला भारतात आणल्यावर या सर्व गोष्टी मुद्दाम आठवल्या .

  किती दिवस या दहशतवादाला आपण तोंड देणार ? इस्राएल सारखा एवढासा देश सहा सात अरब राष्ट्रांना अक्षरशः जेरीस आणतोय.

   तिथल्या नागरिकांच्या मध्ये स्वातंत्र्याचा जो हुंकार आहे त्याला तोड नाही.राष्ट्रप्रेमाचे जे तेज आहे कधिच झाकोळत नाही.

   आपल्याकडे कांहीं आहे का तसे.?

   राजकारणासाठी 208 बिगर मुस्लिमांनी वक्फ बोर्डाचे समर्थन केले.

    उद्या हेच लोक राणा ला वाचवायला मागेपुढे बघणार नाहीत.अतिरेकी असला म्हणून काय झाले.?

तो मते मिळवून देत असेल तर मेलेल्या निष्पाप लोकांसाठी उगीच का छाती बडवत बसायचे.?

    सत्तेची खुर्ची त्यांच्या पेक्षा अधिक महत्वाची.

 जम्मू काश्मीर बदलत आहे.येथील मुस्लिम मुले एक सुरात जण गण म्हणत आहेत. तिथली मुले राष्ट्रावर  भारत राष्ट्र आपले मानू लागली आहेत.इथले मुल्ला मौलवी मात्र राष्ट्र विरोधी विष समाजात पसरवत निघाले आहेत.ते या राणा ला सुद्धा न्यायालयीन मदत करायला मागे पुढे पाहणार नाहीत. 

    आता बोला.

अजून किती दिवस हा दहशतवाद आपण सहन करायचा ?

   घटनेने धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केले आहे.आहेच ते.चुकीचे कांहीही नाही.या देशात राहणाऱ्या नागरिकांनी या देशाचा ध्वज ,राष्ट्रगीत आणि कायदे यांचा सन्मान केलाच पाहिजे.

    दुर्दैवाने आजही अनेक शहरातील झोपड पट्ट्यामध्ये हिरवे झेंडे फडकताना दिसताहेत .त्यावरील अर्धा चांद येणाऱ्या जाणाऱ्या कडे पाहून उपहासाने हसतो आहे.

    विराट कोहली आउट झाला की अजूनही फटाके उडताहेत.

   बनावट आधार कार्ड नाचवून रोहिंगे आणि बांगला देशी सगळ्या सवलती घेत आहेत.वर स्थानिक नागरिकांना दमदाटी करत आहेत.

   हे असं किती दिवस चालणार.इथले कोट्यवधी हिंदू मुस्लिम बंधुभावाने रहात असतांना हा दहशतवाद आपण का आणि किती दिवस सहन करायचा?

  हे सगळं इथल्या सत्तापिपासू राजकारण्यांमुळे हे सांगायला ज्योतिषी नको.

    ममता,अखिलेश,केजरीवाल,राहुल यांनी २६/११चा मास्टर माईंड राणा यांच्या विरोधात आवाज उठवला तरी  देश जिंकला म्हणुया.


  ------------------------------