नवी दिल्ली :मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रानुसार राणाच्या प्रत्यार्पणासंबंधी अटींत फाशी देऊ नये, असे नमूद नाही. पोर्तुगालहून १९९३ मध्ये बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला प्रत्यार्पित करण्यात आले होते. तेव्हा त्या देशाच्या अटी होत्या. त्यानुसार भारतातील कोणतेही न्यायालय अबू सालेमला फाशीची शिक्षा देऊ शकत नाही.
एवढेच नव्हे तर २५ वर्षांहून जास्त शिक्षाही देणार नाही. त्यामुळेच त्यास जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. तेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणाले, २५ वर्षे पूर्ण झाल्यावर त्याची सुटका केली जावी. २०३० मध्ये त्याची शिक्षा पूर्ण होईल. हे लक्षात घेऊन भारताने अमेरिकेला अशा अटी ठेवू नयेत, अशी विनंती केली होती. तिकडे काँग्रेस व भाजप यांच्या प्रत्यर्पणाचे श्रेय घेण्यासाठी शर्यत लागली आहे. काँग्रेसने हे १५ वर्षांच्या परिश्रमाचे फळ असल्याचे म्हटले. भाजपने ही मोठी कामगिरी असल्याचे सांगितले.
--------------------------------------------