नाशिक : लोखंडी कपाटात अंत्यविधीचे पैसे ठेवले आहेत. माझा देहदान करा, तुमची इच्छा असल्यास पत्नीचा अंत्यविधी करा. (घर काम करणाऱ्या महिलेने) सीमाने खूप सेवा केली तिला 50 हजार द्या, नाशिकच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी समोर आली आहे.
नाशिकमध्ये तिची आजारपणातून सुटका करतोय म्हणत सेवानिवृत्त पतीने पत्नीची हत्या करत स्वतःही आत्महत्या केली. नाशिकच्या सावरकरनगरमध्ये मुरलीधर जोशी यांनी पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेत जीवन संपवले. आत्महत्येआधी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवली होती.
एकदंत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुरलीधर जोशी (वय 78) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांच्या पत्नी लता जोशी (वय 71) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. यांसदर्भात, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी दांपत्य हे दोघेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांना दोन मुले आहेत एक प्राचार्य तर दुसरा उद्योजक आहे.
मुरलीधर जोशींनी डायनिंग टेबलावर ठेवलेली सुसाईड नोट त्यांच्याच शब्दात...
इच्छापत्र : मी मुरलीधर रामा जोशी, माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. याचाशी कोणाचा काहीही संबंध नाही. मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी माफ करावे. सौ.सीमाने खूप सेवा केली. तिला माझ्याकडून 50 हजार रुपये चालू खात्यातून द्यावे. ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे. तिचा संबंध नाही. तिच्या मुलाची फी भरण्यासाठी त्याचा उपयोग होईल. लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये अंत्यविधीचे पैसे आहेत. मंगळसुत्र, जोडवे आहेत. ते लताला घालावे. नंतर सीमा राठोड हीला द्यावे. माझे देहदान करावे. लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही.
----------------------------