नवी दिल्ली :पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी पदभार स्वीकारताना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ एप्रिल रोजी झालेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत, सर्व 34 न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत त्यांची मालमत्ता जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायाधीशांनी असेही सांगितले की मालमत्तेशी संबंधित तपशील सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. तथापि, वेबसाइटवर मालमत्तेची घोषणा ऐच्छिक असेल.
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची निर्धारित संख्या ३४ आहे. सध्या येथे ३३ न्यायाधीश आहेत, एक पद रिक्त आहे. यापैकी ३० न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची घोषणा न्यायालयात सादर केली आहे. तथापि, हे सार्वजनिक केलेले नाहीत.
----------------------------------

