कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील ‘इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ₹700 कोटींहून अधिक रकमेच्या लोकोपयोगी विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण आणि नविन विकास कामांचे भूमिपूजन’ केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’ व ‘श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने’च्या लाभर्थ्यांना मंजुरी पत्रांचे तसेच बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, याप्रसंगी बोलताना विकासकामांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणाऱ्या आ. डॉ. राहुल आवाडे यांचे अभिनंदन केले. तसेच, इचलकरंजी मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टींना तात्काळ मान्यता देत, नविन योजना विहित मुदतीत पूर्ण मदत करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केले. इचलकरंजीवासियांसाठी लोकार्पण करण्यात आलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी कष्ट घेणार्या अधिकार्यांचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. डॉ. राहुल आवाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.