माजी आमदार के. पी. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश :म्हेवणे पावणे वाद सोडवण्याचा अजितदादांचा सल्ला

Kolhapur news
By -

 

            



         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री  हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार के. पी. पाटील आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 


   यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले, के पी पाटलांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळच राहणार . तसेच यापुढे भावकी, मेव्हणे पावणे वाद लवकरात लवकर सोडवा, असा सल्ला देत अजित पवारांनी के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांना चिमटे काढले.


माजी आमदार के पी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली होती. तर ए वाय पाटील यांनीही अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, के पी पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. या निमित्ताने अजित पवारांनी के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यातील वादावर मार्मिक चिमटे काढत म्हेवणे पावणे वाद सोडवण्याचा सल्ला दिला.

 

  के. पी. पाटील यांच्या साथीनं राधानगरीत पक्षाला नक्कीच ऊर्जा मिळणार आहे, पक्षाची ताकद वाढणार आहे. तुम्हा सर्वांच्या साथीनं पक्षाची ताकद वाढलीय, याचं मला समाधान आहे. यानिमित्तानं सर्वांनी समन्वयानं, मिळून मिसळून कामं करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. 

      


                       -------------