साई संकुलाच्या तन्वी मगदूम ची आशियाई कुस्ती साठी निवड.

Kolhapur news
By -

 

             


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल ची पै.तन्वी गुंडेश मगदूम व्हिएतनाम या देशात दिनांक १८ ते २६ TC जून २०२५ रोजी होणाऱ्या २३ वर्षाखालील वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या ५९ किलो वजन गटात करणार भारत देशाचं प्रतिनिधित्व. 

दिल्ली येथे दि.२३ मे २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेत हरियाणाच्या आंतरराष्ट्रीय पै.अंजली हिच्यावर १०-० गुणांनी मात करून तन्वीने आशियाई स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.


        मार्गदर्शक


त्यांना एन.आय.एस आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे 

,माजी नगराध्यक्ष,वस्ताद सुखदेव येरुडकर,दयानंद खतकर,सागर देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. 

         

            प्रोत्साहन

 

माजी खासदार.संजयदादा मंडलिक,कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक,साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, कार्यवाह आण्‍णासो थोरवत,डॉ.प्रशांत अथणी,जय शिवराय एज्युकेशन सोसायटी व मुरगूड नगरपरिषद यांचे प्रोत्साहन लाभले .


       _----------------