पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुरगूड मध्ये नालेसफाई.

Kolhapur news
By -

 

           


    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


           मान्सून विहित वेळेपूर्वी सुरू झाल्याने नदी नाले भरून जाण्याची शक्यता आहे.तुंबलेले नाले व गटारे साफ न केल्यास पुराचे पाणी घाणीसह रस्त्यावर येऊ शकते.शहरातून नदीला जाऊन मिळणारे नाले जे सी बी ने साफ करण्याचा धडाका मुरगूड नगर परिषदेने सुरू केला आहे.

    नाका नंबर एक पासून दत्तप्रसाद हॉल जवळून जाणारा व नदीला मिळणारा प्रमुख नाला साफ करण्यात आला.नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कांहीं समाजसेवी स्वयंसेवकांनी सहकार्य केले. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा साठला होता.त्यात प्रामुख्याने प्लास्टिक बाटल्या व तत्सम प्लास्टिक वस्तूंचा समावेश होता. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश वाळुंजे यांना पूर पूर्व परिस्थितीची माहिती स्वयंसेवकांनी एका निवेदनाद्वारे दिली होती व नाल्यांच्या तथा गटारांच्या सफाईची मागणी केली होती.त्यांनी  या कामास प्राधन्य दिले व सफाईला सुरुवात झाली.

    

  स्वच्छता निरीक्षक सचिन भोसले यांच्या देखरेखीखाली नाले सफाई करण्याचे काम सुरू आहे.याकामी नगरपरिषद स्वच्छता  मुकादम बबन बारदेसकर  कर्मचारी अक्षय कांबळे,कृष्णात कांबळे, भिकाजी कांबळे यांच्यासह स्वयंसेवकातून सर्जेराव भाट,ओंकार पोतदार,तानाजी भराडे,उदय पाटील,बाजीराव लाड ,सुखदेव चव्हाण,सौरभ मोरे,यांचे सहकार्य लाभले.




         -----------------------------