कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल विधानसभा मतदारसंघातील नानीबाई चिखली येथील समरजीत घाटगे गटातून दिलीप काईत ,अनिल काईत , सुरज तेली , रावसाहेब गळतगे , प्रमोद वाडकर , धोंडिराम वाडकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.
प्रवेश केलेल्या सर्व कुटुंबीयांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आम्ही चूक केली असं कदापिही वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचे जे जे काही विकास कामाचे काम असेल ते मी करून देईन असा विश्वास मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिला.
यावेळी पक्ष प्रवेशावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले, सदाशिव तुकान, बाबुराव वाडकर , बाळासो घस्ती इतर मान्यवर उपस्थित होते.
----------------------