चिखली हायस्कूलचे माजी विद्यार्थी १८ वर्षांनी आले एकत्र

Kolhapur news
By -

 

          


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


             चिखली इंग्लिश स्कूल चिखली हायस्कूल मधील सन २००६ /२००७ चे माजी विद्यार्थी १८ वर्षानंतर स्नेहमेळाव्यात एकत्र भेटले. कार्यक्रमात भावनिक होत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रगीताने मेळाव्याला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शरद बोरवडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक लोकरे सर उपस्थित  होते.


  सुरुवातीला उपस्थित शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. यावेळी आत्तापर्यंत दिवंगत झालेले माजी शिक्षक व दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी  पडलेल्या देशवासीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते भेटवस्तु, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.


  काही  महिन्यापूर्वी या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेळाव्याची कल्पना आखली. यानंतर सर्व मित्रांनी स्नेहमेळावा आयोजित करण्याचे ठरवले. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सुरुवातीला सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. यावेळी तत्कालिन शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विचारपूस करत त्यांना मार्गदर्शन केले. ४२ विद्यार्थी  स्नेह मेळावा कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

         

                ---------------------

   

               उपस्थित गुरुवर्य व कर्मचारी

   

  उत्तम कुंभार सर ,सुरेश मगदूम ,लोकरे सर ,चौगुले सर ,नाईक सर , ए आर पाटील सर , नलगे मॅडम ,शंकर मामा,आकाश कांबळे ,गडकरी मॅडम

        

           --------------------------


       
       
         


          



    -----------------------------