पाकिस्तानचे रडार भारताकडून उध्वस्त : ५० ड्रोन चे केले हल्ले : भारताच्या १५ शहरावर होणार होते हल्ले

Kolhapur news
By -

              

           


      नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये नऊ दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त झाले, ज्यामध्ये पीओकेमधील 5 तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी ठिकाणांचा समावेश होता, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने बुधवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं  पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. तसेच पाकिस्तानच्या बारा शहरांवर एकामागून एक पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी देखील भारतानं स्विकारली आहे.


याबाबत माहिती देताना भारताच्या संरक्षण विभागानं म्हटलं आहे की, पाकिस्तानमधील अनेक हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य करून निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या उत्तर आणि पश्चिम लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेत्रणास्त्र हल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.  पाकिस्तानवर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.


भारताने हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टीमच उद्ध्वस्त करण्यात आली असून पाकिस्तानच्या मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न उधळवून लावला आहे. 


     भारताच्या १५ ठिकाणी हल्ला करण्याचा  पाकिस्तानचा प्रयत्न होता. पण तत्पूर्वीच आज सकाळी पाकमधल्या अनेक ठिकाणचे रडार भारताकडून उध्वस्त करण्यात आले . 



       -------------------------