कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जम्मू कश्मीरमधील पहे लगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारतीय जवानांनी ऑपरेशन सिन्दुर द्वारे चोख उत्तर दिले. मुरगूड करांनी या मोहिमेचे अत्यंत जल्लोषी स्वागत केले आहे.या मोहिमेला दिलेले नाव सुद्धा अत्यंत समर्पक आहे असे अनेक नागरिकांनी सांगितले.२२एप्रिल रोजी २६ निरपराध पर्यटकांची नृशंस हत्या करणाऱ्या अतिरेकी संघटनाचे कंबरडेच मोडले आहे.
आम्हीं सगळे भारतीय जवानांबरोबर आहोत.वेळ पडली तर राष्ट्रासाठी पडेल ती जबाबदारी आम्हीं अत्यंत निष्ठेने पार पाडू.आमच्या सेनादलाचा आम्हांला अत्यंत अभिमान वाटतो.या मोहिमेत सहभागी झालेल्या आमच्या वीरांगना भगिनींना तर आमचा मानाचा मुजरा आहे.अशा विविध भावना युवकांच्यातून व्यक्त करण्यात आल्या.
आतंकवादाला कोणताही धर्म नसतो.त्याचा खात्मा झालाच पाहिजे.भारत माता की जय .वंदे मातरम् च्या घोषणांनी शिवतीर्थ परिसर दणाणून गेला.पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून ऑपरेशन सिंदूर च्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.
मॉकड्रिल,सेनेला अन्नधान्य पुरवठा ,किंवा प्रशासन सुचवेल त्या सर्व सेवा देण्याची तयारी मुरगूडच्या युवा नागरिकांनी दाखवली.आवशक तर सह्यांची मोहीम सुरू करू असेही तरुणांनी सांगितले.
यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी , संतोष वंडकर , ओंकार पोतदार ,भाजप उपाध्यक्ष मयुर सावर्डेकर, तानाजी भराडे ,अनुबोध गाडगीळ, प्रकाश परिशवाड , अभी मिटके, रणजीत मोरबाळे, आनंद रामाने , बाळासो सूर्यवंशी धनंजय सूर्यवंशी, भाऊ येरुडकर. अमोल मेटकर. संग्राम साळोखे ,बाळासो चव्हाण , गणेश भाट , वेदांत मंडलिक ,गोपी भाट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारत मातेच्या जयजयकाराने सांगता झाली.
------------------------------