ऑपरेशन सिंदूर... प्रत्येक भारतीयाचा अभिमानाने भरून आलाय उर.

Kolhapur news
By -

 

                

         

    कोल्हापूर न्यूज  /  वि .रा.भोसले

      

           २२ एप्रिल २८ निरपराध पर्यटकांची निर्दयी हत्या. आमच्या आया बहिणीचे कुंकू पुसले गेले.अश्रूंचे बांध फुटले .देशभर संतापाची लाट पसरली.जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवायची हीच वेळ आहे.निष्पाप निशस्त्र भारतीयांच्या हत्येचा सूड घेण्याची हीच वेळ होती. ७ मे.मध्यरात्री दोन वाजता भारतीय जवानांनी एअर स्ट्राइक करून अतिरेक्यांचे ९ अड्डे उध्वस्त केले. १०० हून अधिक अतिरेकी मारले गेले.मरायलाच हवेत.ज्याने २६/११चा मुंबई हल्ला घडवून आणला तो मास्टर माईंड मुल्ला हाफिज ऊर बडवून रडला.त्याच्या कुटुंबातले १४ जण मारले गेले.नाही येत त्यांची दया आम्हांला.आमचे २८ निष्पाप पर्यटक मारले गेले तेव्हां त्यांनी बिर्याणी शिजवून खाल्ली होती.

 

 इस्राएल,अमेरिका या देशांनी या जबरदस्त कारवाईला पाठिंबा जाहीर केलाय. ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं.इस्राएल वर्षभर स्वतःच्या अस्मिते साठी झुंजत आहे.अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले . तो अतिरेक्यांचा हुतात्मा होऊ नये म्हणून त्याला समुद्राच्या तळाला गाडले.९/११च्या हल्ल्याचा अमेरिकेने असा बदला घेतला होता.

   

 हिम्मत असेल तर त्या त्या देशांच्या सशस्त्र सैन्याबरोबर लढा.निशस्त्र , निष्पाप नागरिकांना का मारताय ? का ? का ?त्यांनी तुमचं काय वाईट केलंय ?एअर स्ट्राइक मध्ये जे मारले गेले ते सगळे अतिरेकी होते.आमच्या जवानांनी एकाही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला मारले नाही.

 जय हो जवानांनो.


जीवावर उदार होऊन मध्यरात्री तुम्ही ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले .भारतरत्न सचिन तेंडुलकरने तुम्हांला सलाम ठोकला आहे.ज्याचे कुंकू पुसले त्या माय भगिनींनी तुम्हांला दुवा दिला आहे.  त्यांच्या दुःखाश्रुंना न्याय मिळाला आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या जवानांना सॅल्युट करण्यासाठी मुरगूडच्या  राष्ट्रप्रेमी नागरिकांनी शिवतीर्थावर जमावे असे आवाहन शिवभक्तांनी केले आहे.

   

   ऑपरेशन सिंदूर ला सॅल्युट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून आला आहे.

           २२ एप्रिल .

          २८ निरपराध , निशस्त्र

-------------------------------------