बारावी रिपीटर विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; पुरवणी परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

Kolhapur news
By -

 

                 


    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी (इ.१२वी) फेब्रुवारी - मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ५ मे रोजी ऑनलाईन जाहीर केला होता. या निकालानंतर आता जून - जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 


या परीक्षेसाठी खालील प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात - 

- फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी

- पूर्वी परीक्षा फॉर्म भरलेले पण परीक्षेला अनुपस्थित राहिलेले खाजगी विद्यार्थी

- नवीन खाजगी उमेदवार ज्यांनी जून-जुलै २०२५ परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे

- श्रेणीसुधार योजना व तुरळक विषयांसाठी अर्ज करणारे विद्यार्थी

- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे "Transfer of Credit" घेतलेले विद्यार्थी अर्ज भरल्यानंतर संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज लॉगिनद्वारे "Pre-List" डाउनलोड करून त्यातील माहिती जनरल रजिस्टरशी पडताळून घ्यावी आणि अचूक असल्याची खात्री करून विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा असून त्याच्या तारखा खालीलप्रमाणे - 

महत्त्वाच्या सूचना - 

- अर्ज भरताना फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेतील माहिती स्वयंचलितपणे उपलब्ध असेल.

- श्रेणीसुधार करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु-मार्च २०२६, जून-जुलै २०२६) उपलब्ध राहतील.

- शुल्क भरणे हे केवळ ICICI बँकेच्या व्हर्च्युअल अकाउंटमध्ये NEFT/RTGS च्या माध्यमातून करावे लागेल. जुन्या बँकांचे चलन वापरू नये व रोखीने भरणा स्वीकारला जाणार नाही.

- शुल्क भरल्याशिवाय प्रवेशपत्र दिले जाणार नाही.

- नियमित आणि विलंब शुल्काच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.

- अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.


उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT द्वारे रक्कम भरावयाची तारीख

शुकवार दि.२३/०५/२०२५ असेल

  उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख

सोमवार दि.२६/०५/२०२५ असेल  विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा

नियमित शुल्क भरावयाची तारीख बुधवार, दिनांक ०७/०५/२०२५ ते शनिवार, दिनांक १७/०५/२०२५ व

विलंब शुल्क भरावयाची तारीख रविवार, दिनांक १८/०५/२०२५ ते गुरूवार, दिनांक २२/०५/२०२५ पर्यंत असेल अशी माहिती प्रसिध्दीस कोल्हापूर मंडळ विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.


    -----------------------------------------