मुरगूड शहरामध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करावे या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर

Kolhapur news
By -

              


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      मुरगूड पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रातील ५४ गावांमधील पक्षकारांसाठी मुरगूड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करावे असे निवेदन येथील कांहीं सामाजिक कार्यकर्त्यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे सादर केले. यापूर्वी ५४ गावच्या ग्राम सभांचे ठराव करून जिल्हाधिकारी यांचे कडे पाठवले आहेत.अनेक वेळा आंदोलन सुद्धा केले आहे पण कोणतीही कार्यवाही झाली नाही. पक्षकारांना व पोलिसांना न्यायालयीन कामाकरीता ३३ किलोमीटर दूर कागल येथे हेलपाटे घालावे लागतात. नियमित ,वक्तशीर  सोयीची प्रवासी वाहतूक व्यवस्था सुध्दा नाही.त्यामुळे पक्षकार  व संबंधित कर्मचाऱ्यांची फरफट होते.

  

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करू असे शिष्टमंडळास आश्वस्त केले. शिष्टमंडळात  माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजीत सूर्यवंशी,  सर्जेराव भाट, दत्तात्रय मंडलिक.संपतराव कोळी.ओंकार पोतदार,प्रशांत कुडवे,दत्तात्रय साळोखे,संदीप भारमल,तानाजी भराडे  इत्यादींचा समावेश होता.


               ------------------------