शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

Kolhapur news
By -

 

          


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याकरिता २२३.०८ लाख इतका निधी मंजूर असून क्षेत्र विस्तार कार्यक्रम घटकांतर्गत एकूण रु. १५.६६ लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.


शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळ पिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.


यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळ पिकांच्या जुन्या फळ बागांचे पुनरुज्जीवन करणे तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे या बाबींचा समावेश आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळ बागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे.


फुले लागवड - 

कट फ़्लॉवर्स (गुलाब, ऍस्टर, बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनियास, गोल्डनरॉड, शेवंती इ.), खर्चमर्यादा - रु.१ लाख २५ हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड - एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.५० हजार प्रतिहेक्टर


कंदवर्गीय फुले- 

(निशिगंध, ग्लॅडीओलस, लिलिज, लिलियम, कॅलालिली, डेलिया इ.)- खर्चमर्यादा – रु. २ लाख ५० हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. 1 लाख प्रतिहेक्टर


सुटी फुले- 

(झेंडू, ऍस्टर, गॅलार्डिया, हेलिक्रायसम, शेवंती, मोगरा, जाई, जुई, झिनिया, बिजली इ.) खर्चमर्यादा – रु. ५० हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. २० हजार प्रतिहेक्टर


मसाला पिक लागवड- 

बियावर्गीय एव कंदवर्गिय मसाला पिके (मिरची, हळद व आले) खर्चमर्यादा- रुपये ५० हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.२० हजार प्रतिहेक्टर


बहुवर्षिय मसाला पिके (काळीमिरी, कोकम इ.) -


खर्चमर्यादा - रु. १ लाख प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० याप्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. ४० हजार प्रतिहेक्टर


विदेशी फळ पिक लागवड-

 ड्रॅगनफ्रुट- खर्चमर्यादा – रु.६ लाख ७५ हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. लाख ७० हजार प्रतिहेक्टर


---------------------------------