वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावचे दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश

Kolhapur news
By -

 

            


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित, वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावने दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. विद्यालयाचा एकूण  निकाल  ९७.८० टक्के लागला.सेमी १०० टक्के,सेमी संस्कृत १०० टक्के व टेक्निकलचा १०० टक्के लागला आहे. 


 गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी -                                           प्रथम क्रंमाक- कु. कोळी समीक्षा दीपक        (96.20% ),द्वितीय क्रमांक कु. पाटील अदिती विकास

( 94.60% ),तृतीय क्रमांक  कु. पाटील अनुजा संजय   

 ( 91.60% ),  टेक्निकल शाखा प्रथम क्रमांक

 कु. सुनिता रामू गुंडरे (75% ), मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कु.वरद सचिन डोईफोडे   (90.20% )आदीनी यश संपादन केले.

90% पेक्षा जास्त 9 विद्यार्थी,80 ते 90 % दरम्यान 26 विद्यार्थी ,70 ते 80% दरम्यान 45 विद्यार्थी यांनी यश मिळविले आहे.


   या यशवस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई , चेअरमन डॉ. सौ. मंजिरी मोरे- देसाई , प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य  बाळ डेळेकर , कौन्सिल सदस्य ए. ए.पन्हाळकर वरिष्ठ लिपिक  के. बी. वाघमोडे  यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका सौ. आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक एस. एच. निर्मळे , पर्यवेक्षिका यु.सी. पाखरे, टेक्निकल विभाग प्रमुख ए. एस.आंबी व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.


              ------------------------