देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

Kolhapur news
By -

         



  मुंबई :  देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत . 


   मुंबई येथे मंत्रालयात  राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत राज्यातील देवस्थानच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार या विषयांबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 


बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमिनीबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी   देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबण्याचे आदेश दिले आहेत.

  

    कोल्हापूर शहर आणि उपनगरे नकाशा, वाढीव गावठाणाचा सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत मागणी  कोल्हापूरचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी यावेळी या बैठकीत केली. तसेच जिल्ह्यातील १०० गावांचा सर्व्हे करून  नकाशा बनवून पायलट प्रकल्प तयार करावा अशा सूचना या बैठकीत जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या . या  बैठकीस आमदार अमल महाडिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .


    -------------------------------