आर्या आणि आदिती चे दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश.

Kolhapur news
By -

 

                      




         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         मुरगूड विद्यालय मुरगूडच्या दोन जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या उल्लेखनीय यशा बद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

    आर्या ला ९६ % तर आदितीला ९५.२० गुण मिळाले.आदिती टेक्निकल विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून  राज्यात प्रथम आली तर आर्या ने इंग्रजी विषयात ९६ गुण मिळवून मुरगूड केंद्रात त्या विषयात पहिला क्रमांक पटकावला.

    या दोन्ही मुलींचे  के जी ते चौथी पर्यंतचे शिक्षण मुरगूडच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये झाले.उत्तम हस्ताक्षर,टापटीपणा आणि अभ्यास व क्रीडा यातील नैपुण्याचे प्रशस्ती पत्र सुद्धा त्यांना तेथे मिळाले होते.मुरगूड विद्यालयाचे अध्यापक अनिल पाटील यांच्या त्या जुळ्या कन्या आहेत.

   दोन्ही शाळांनी त्यांच्या उज्वल यशाबद्दल अभिनंदन केले आहे.


            -------------------------------