छत्रपती शिवाजी सहकारी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कपील भोसले व व्हाईस चेअरमनपदी स्वप्नील कोळेकर यांची निवड

Kolhapur news
By -

 

           

 

                


             कोल्हापूर न्यूज / हेरले प्रतिनिधी


हेरले येथील छत्रपती शिवाजी सहकारी विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कपील भोसले व व्हाईस चेअरमनपदी स्वप्नील कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली.अध्यक्षस्थानी सहकारी निवडणूक अधिकारी नितीन माने होते.यावेळी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

 

  माजी सभापती राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी सहकारी सेवा संस्थेची यशस्वी घौडदौड सुरू आहे. त्यांनी दुसऱ्यांदा संस्थेवर सत्ता स्थापन केली असून ते सत्तेच्या विक्रेंदीकरणाच्या विचारातून प्रत्येकास सत्तेच्या पदाच्या माध्यमातून संधी देत आहेत.

 

 यावेळी संचालक राजेश पाटील, अरविंद चौगुले,लक्ष्मण निंबाळकर, सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, अशोक मुंडे, उदय चौगुले, कृष्णात खांबे, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र कदम, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील सेक्रेटरी नंदकुमार माने, रविंद्र मिरजे,सूरज पाटील, गुरु नाईक अक्षय इंगळे,प्रमोद तोड़कर आदी उपस्थित होते.


        ------------------------------